
पिंपरी : पिंपरी येथे भरवस्तीत गोळीबार करून दुकानदाराला जखमी करणारा आरोपी कुख्यात रवी पुजारी टोळीचा शुटर असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्याने यापूर्वी सहा वेळा गोळीबार केला असून बांधकाम व्यावसायिकांना लक्ष करण्याची त्याची गुन्हेगारी पद्धत आहे. चिंचवड परिसरातून मोटारसायकल चोरून त्याने पिंपरी गुन्हा केला होता. पैशांची चणचण भासल्याने त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.