खाऊ गल्‍लीवर वॉच कोणाचा?

खाऊ गल्‍लीवर वॉच कोणाचा?
Published on

पिंपरी, ता. २२ ः शहरातील रस्‍त्‍यालगत चौकाचौकात सुरू झालेल्‍या खाऊ गल्‍ल्‍यामध्‍ये अस्‍वच्‍छता, भेसळयुक्‍त पदार्थाचा वापर केला जात असल्‍याच्‍या तक्रारी वाढल्‍या आहेत. प्रचंड अस्वच्छतांबरोबरच धूळ, माश्या आणी पावसाळी वातावरणामुळे विषाणू प्रादुर्भाव लवकर होतो. दरम्‍यान, शहरातील अशा खाऊ गल्‍ल्‍यांवर अन्‍न व औषध प्रशासनाने मोहीम राबविण्‍याची आवश्‍यकता आहे.
चौकाचौकांत खाऊ गल्‍ल्‍या उभारल्‍या जात आहेत. हातगाडी, ठेल्‍यांवर खाद्य पदार्थ विकले जातात. मुख्‍यतः हे विक्रेते अस्‍वच्‍छ जागेवरच उभे असतात. त्‍यातच पदार्थ बनविण्‍यासाठी वापरलेले जाणाऱ्या भाज्‍या, पाणी याचा दर्जा राखला जात नाही. शिळे अथवा रात्री राहिलेले अन्‍नपदार्थ गरम करून, फ्रीजमध्‍ये ठेवून पुन्‍हा ग्राहकांना दिले जात असल्‍याचा आरोप करण्‍यात येत आहे.

काय आढळले
शहरातील काही खाऊ गल्‍ल्‍यातील दुकानांची पाहणी केली असता परिसरात अस्‍वच्‍छता, कचऱ्याच्या बादलीतून बाहेर आलेला कचरा, उघड्यावर अन्‍नपदार्थ, मळकट तवा, भांडी दिसून आल्यास तसेच, रस्‍त्‍यावरील प्रचंड धूळ खाद्यपदार्थावर जमा होत होती. ग्राहकांनी खालेली भांडी तशीच साबणाच्‍या पाण्‍यात काढून दिले जाते.

कुठे आहेत खाऊ गल्‍ल्‍या
शहरातील बहुतांश सर्वच चौकात अशी दुकाने आहेत. विशेषतः चिंचवड, आकुर्डी, थेरगाव, काळेवाडी, संभाजीनगर, रावेत, संत तुकाराम नगर, साई चौक, पिंपळे सौदागर, रहाटणी येथे ही दुकाने आहेत.

पुण्‍यात कारवाई, पिंपरी कधी?
खाऊ गल्‍ल्‍या अर्थात रस्‍त्‍यावरील या दुकानातील अस्वच्छतेबाबत अन्‍न व औषध प्रशासनाने गेल्‍या आठवड्यात मोहीम राबवली होती. पुण्‍यातील जंगली महाराज रस्‍ता व फग्‍युर्सन महाविद्यलय परिसरात ३१ दुकानांची तपासणी केली. त्‍यात विनापरवाना, अन्‍न सुरक्षा नियमांचे उल्‍लंघन करणे यासह अस्‍वच्‍छतेबाबत १४ दुकानांवर कारवाई केली. मग, हीच कारवाई पिंपरीत करावी, अशी मागणी केली आहे.

संशयित अन्‍न पदार्थ विक्री, दुकानांची तपासणी सुरू आहे. त्‍यात दोषी आढळलेल्‍यांवर कारवाई देखील केली आहे. पुण्‍यानंतर पिंपरीत देखील ड्राईव्ह घेतला जाईल.
- दिगंबर भोगावडे, सह आयुक्‍त, अन्‍न व औषध प्रशासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com