esakal | Pimpri | ‘फर्स्ट कम फर्स्ट’साठी दोन दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावीची प्रवेश प्रक्रिया

पिंपरी : ‘फर्स्ट कम फर्स्ट’साठी दोन दिवस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अकरावीच्या पहिल्या फेरीत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. आता प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असून, ‘फर्स्ट कम फर्स्ट ’ला प्रवेशासाठी दोन दिवस राहिले आहेत. परिणामी उर्वरित विद्यार्थांनी प्रवेश घेण्याचे आवाहन महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे.

केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने दिलेल्या सूचनेनुसार, शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीचे वर्ग सुरू केले. मात्र, अद्याप काही कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. ‘फर्स्ट कम फर्स्ट’ प्रवेशासाठी मुलांकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याचे काही महाविद्यालयांची माहिती आहे. पण सध्या कोविड नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात येत आहे.

हेही वाचा: Pune : वरंधा घाटातील अपघातात लहान मुलीसह तिघेजण जखमी

कनिष्ठ महाविद्यालयात काही कला, वाणिज्य शाखेचे वर्ग सकाळी साडेसात ते पावणे अकरा, तर विज्ञान शाखेचे वर्ग सकाळी साडे अकरानंतर भरविण्यात आले. एक दिवसाआड ५० टक्के विद्यार्थिनी संख्या ठेवली आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसलेले होते.

अकरावीचे ऑफलाइन वर्ग सुरू झाल्याने आम्हाला खूपच फायदा होणार आहे. सर्व शिक्षक आमची काळजी घेतात.

- नंदिनी संतोष मगर,अकरावी कॉमर्स

कोविडची तीव्रता कमी झाल्याने नियमांचे पालन करून, अकरावीचे वर्ग सुरू केले आहेत. अकरावीचे ऑफलाइन वर्ग सुरू झाल्याने अध्यापनाचा फायदा होणार आहे.

- प्रियांका सुनील साळवे,अकरावी कॉमर्स

loading image
go to top