

Leopard Attack
sakal
वाल्हे : सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी (ता. पुरंदर) येथील शिंदेनगर परिसरात शेतात काम करत असताना एका ज्येष्ठ नागरिकावर अचानक बिबट्याने हल्ला केला. अचानक समोर आलेल्या बिबट्याने डरकाळी फोडली, मात्र शिंदे यांनी धैर्य न गमावता हातातील काठीच्या साहाय्याने प्रतिकार केला.