गुंगीचे औषध देऊन लुटणारी पिंकी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

धार्मिक स्थळावर दर्शनासाठी आलेल्या वृद्ध महिलांना प्रसादातून गुंगीचे औषध खायला देऊन त्यांना लुटणाऱ्या पिंकी नावाच्या महिलेस अखेर फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Crime
CrimeSakal

पुणे - धार्मिक स्थळावर दर्शनासाठी आलेल्या वृद्ध महिलांना प्रसादातून गुंगीचे औषध (Drugs Medicine) खायला देऊन त्यांना लुटणाऱ्या पिंकी नावाच्या महिलेस अखेर फरासखाना पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या. पोलिसांनी तिच्याकडून गुंगीचे औषध व इतर साहित्य जप्त केले. (Pinky Who Robbed Her with Drugs Finally Caught Police)

पिंकी परियाल (रा.गौशाला रोड, जमशेदपुर, झारखंड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार पेठेत राहणाऱ्या 72 वर्षीय महिला बुधवार पेठेत किरकोळ वस्तु विक्री करीत होती. त्यावेळी वृद्ध महिलेला संबंधीत महिलेने 25 जुन रोजी दरमहा दोन हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिला रिक्षातुन स्वारगेट येथे नेले. रिक्षातच महिलेस प्रसादातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडील रोकड व अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन महिला पसार झाली होती. या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू करण्यात आला.

Crime
शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी; अमोल कोल्हे भडकले

दरम्यान, फरासखाना पोलिस तपास करीत असताना संशयित महिला पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये जाताना पोलिसांना दिसली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित लॉजच्या नोंदणी पुस्तकाची पाहणी केली. त्यामध्ये त्यांना पिंकी परीयाल असे नाव नोंदविल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. यावेळी पुणे स्टेशनच्या परिसरातच पिंकी चोरी करण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या सुचनेनुसार, सहायक पोलिस निरीक्षक मनोज अभंग याच्या पथकाने तिला सापळा रचून ताब्यात घेतले. चौकीशी केल्यानंतर तिने विविध ठिकाणी याच पद्धतीने वृद्ध महिलांना लुबाडल्याची माहिती पुढे आले. परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी रिजवान जिनेडी, सचिन सरपाले, आकाश वाल्मिकी, अमोर सरडे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

अशी होती पिंकीची लुबाडण्याची पद्धत !

पिंकी परियाल ही झारखंडमधील गौशाला रोड परिसरातील मुळची रहिवासी आहे. ती पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाते. तेथे वृद्ध महिलांना झोपेच्या गोळ्याची पावडर मिसळलेले पेढे खायला द्यायची. महिला बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने व रोकड घेऊन ती पळ काढत होती. शिर्डी परिसरात देखील तिने याच पद्धतीने महिलांचे दागिने चोरत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com