

Fatal Rickshaw Collision in Ghotavde leads to death of one
Sakal
पिरंगुट : घोटवडे (मुळशी) येथील शेळकेवाडीमधील रस्त्यावर दोन रिक्षा समोरासमोर धडकल्याने एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.आज सकाळी सात वाजता झालेल्या या अपघातात दुसरा रिक्षाचालक व त्यातील प्रवासी विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. भरमत विष्णू शेळके (वय ३४ , रा. शेळकेवाडी , पिंपळोली , ता.मुळशी ) आहे मृत व्यक्तीचे नाव असून दुसरा रिक्षा चालक अजय काळुराम मातेरे व महेश गेणभाऊ मातेरे (मातेरेवाडी , घोटावडे) असे दोघेजण किरकोळ जखमी झालेले आहेत.