मुळशीच्या कोंडीवर प्रशासनाला अखेर जाग

मुळशीच्या कोंडीवर प्रशासनाला अखेर जाग
Published on

पिरंगुट, ता. ६ :  मुळशी तालुक्यातील जीवघेण्या वाहतूक कोंडीवर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. आमदार शंकर मांडेकर यांच्या मागणीनंतर विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी सर्व संबंधित विभागांना तातडीच्या व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून, लवकरच कार्यवाही सुरू होणार असल्याची माहिती मांडेकर यांनी दिली.
हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, म्हाळुंगे, सुस, नांदे, भुगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा ते पौड परिसरात मागील काही वर्षांत वाढलेले अनियंत्रित नागरीकरण, गृहप्रकल्प आणि औद्योगिक विकासामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. या नरकयातनांमधून नागरिकांची सुटका करण्यासाठी आमदार मांडेकर यांनी थेट विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे धाव घेतली होती. याची दखल घेत आयुक्तांनी संबंधित सर्व विभागांना कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती करण्यावर भर दिला जाणार असून, वाकड ते घोटावडे फाटा परिसरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून सर्व खड्डे प्राधान्याने बुजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून प्रमुख चौकांत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाईल. नो-पार्किंग, राँग साईड ड्रायव्हिंग आणि अनधिकृत वाहतुकीवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच, रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या हातगाड्या व इतर अडथळे संयुक्त सर्वेक्षणाद्वारे तातडीने निष्कासित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विनापरवानगी रस्ते खोदणाऱ्यांवर कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, या कामांसाठी एक खिडकी परवानगी प्रणाली लागू केली जाईल. या सर्व उपाययोजनांवर देखरेख ठेवण्यासाठी संयुक्त पाहणी व आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत.

पीएमआरडीएच्या कामांना डेडलाइन
माण डेपो ते बालेवाडी स्टेडियम मेट्रो सेवेला गती देणे, पीएमआरडीएच्या प्रस्तावित रस्त्यांचे भूसंपादन व निविदा प्रक्रिया ३० दिवसांत पूर्ण करणे आणि प्रत्यक्ष कामाला सहा महिन्यांत सुरुवात करण्याचे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com