Pune Crime : कामगाराची अडवणुक करुन केली लुट; तिघे जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime : कामगाराची अडवणुक करुन केली लुट; तिघे जेरबंद

Pune Crime : कामगाराची अडवणुक करुन केली लुट; तिघे जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री : पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्याने कामावरून घरी जाणाऱ्या कामगाराला लुटणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. शनिवारी (दि. १३ नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास अडवून एक हजार ७०० रुपये, एटीएमसह महत्त्वाची कागदपत्रे जबरदस्तीने चोरून नेली होती.

हेही वाचा: Delhi Pollution: बंद करता येऊ शकणाऱ्या उद्योगांची यादी काढा: सुप्रीम कोर्ट

सोहेल फारुख शेख (वय २३), गोविंद विनायक हाके (वय २१), राहील माजिद शेख (वय २१, तिघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पिसोळीतील २६ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली होती, त्यानुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

हेही वाचा: भाजपने पैसे वाटले, दंगलीचं रचलं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक

पोलिसांनी सांगितले की, पिसोळी (ता. हवेली) येथील धर्मावत पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्यावरून फिर्यादी कामावरून घरी पायी जात होते. त्यावेळी आरोपींनी दुचाकी त्यांच्या जवळ नेत रोख एक हजार ७०० रुपये,एटीएम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे जबरदस्तीने चोरून नेली. कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरवसे पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top