पिसोळीकर खड्डेमय रस्ते, मोकाट कुत्र्यांमुळे हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pisolikar stricken by Bad roads and stray dogs

पिसोळीकर खड्डेमय रस्ते, मोकाट कुत्र्यांमुळे हैराण

उंड्री - रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार, खड्डे आणि मोकाट कुत्र्यांमुळे दुचाकी चालवावी की नाही, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. कोरोनातून सुटका झाली असली तरी, पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मोकाट कुत्री आणि रस्त्यातील खड्ड्यांमुळे शाळकरी मुलांसह ज्येष्ठ नागरिक, महिला कमालीच्या त्रासल्या आहेत. प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आणि रस्ते दुरुस्ती करावी, अशी आर्जवी मागणी उंड्री-पिसोळीतील नागरिकांकडून केली जात आहे.

भल्या पहाटे मार्केटमध्ये भाजीपाला घेऊन जाणारा शेतकरीवर्ग, खरेदीदार, व्यायामासाठी कोंचिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिकांना व्यायामासाठी मोकाट कुत्र्यांच्या भीतीमुळे घराबाहेर पडावे की नाही असा प्रश्न पडला आहे. कामगारवर्गाला रात्री-अपरात्री घरी येताना अंधारामध्ये खड्डेमय रस्त्यावर वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यात मोकाट कुत्र्यांच्या भीतीमुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची व्यथा रश्मी भिंताडे, ललिता कामठे, शुभदा होले, मारुती चव्हाण, दिलीप लोखंडे, संजय चव्हाण यांनी मांडली.

चायनीज हातगाड्या, हॉटेल्स, टपऱ्यावरील शिल्लक अन्न रस्त्याच्या कडेला टाकले जाते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. अगदी १०-१५ कुत्र्यांचा गट जोरजोरात भुंकत पाठलाग करतात. अंधारामध्ये खड्डे चुकवावेत की कुत्र्यांपासून बचाव करावा, असा प्रश्न दुचाकीचालकांना पडला आहे.

- मयूर पवार, पिसोळी.

पालिका प्रशासनातील श्वान पथक विभागाने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, पथ विभागाने पथदिवे सुरू करावेत, खड्डे दुरुस्ती करावी, रस्त्याच्या कडेला शिल्लक अन्न टाकणाऱ्यावर कडक कारवाई करावी.

- मनिषा कड, पिसोळी

मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी पाच स्कॉड आणि दोन संस्था काम करीत आहेत. मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी आणि लसीकरण केली जाते. नागरिकांच्या तक्रारीनुसार तातडीने श्वान पथक जाऊन मोकाट कुत्र्यांना पकडते.

- सारिका फुंदे, पशु वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

दरम्यान, पिसोळी आणि उंड्रीतील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत १२ मीटर रुंदीच्या अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती तातडीने केली जाते, असे कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता नरेश शिंगडे यांनी सांगितले.

Web Title: Pisolikar Stricken Bad Roads And Stray Dogs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bad RoadStray DogsUndri