
सय्यदनगर रेल्वेगेट-हांडेवाडी चौक दरम्यान रस्ता कमी खड्डे जास्त अशी अवस्था आहे.
खड्डे, जलमय रस्त्यावर वाहनचालकांना दिसतोय यमदूत
उंड्री - सय्यदनगर रेल्वेगेट-हांडेवाडी चौक दरम्यान रस्ता कमी खड्डे जास्त अशी अवस्था आहे. मागिल आठवड्यापासून संततधार पावसामुळे निसरड्या रस्त्यावरून दुचाकी-पादचाऱ्यांना घसरून अपघात होत आहे, तर खड्डे आणि जलमय रस्त्यावर साक्षात यमदुतच दिसत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.
हांडेवाडी रस्त्यावर श्रीराम चौक, भुजबळ चौकामध्ये उदंड जहाले खड्डे अशी अवस्था आहे. या रस्त्यावरील पथदिवे वारंवार बंद असल्याने रात्रीच्या वेळी दुचाकी खड्ड्यात कोलमडून अपघात होत आहेत. पादचारी घसरून पडत आहेत, असे योगेंद्र गायकवाड, ओंकार बडवे, रोहिदास सायकर, रामदास गाडेकर, विकास भुजबळ, खंडेराव जगताप, संजय भुजबळ, इम्रान मणियार, शिवाजी जाधव यांनी सांगितले.
श्रीराम चौकात नवीन पावसाळी वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केले होते, पावसाळी वाहिनी टाकली असून, खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. भुजबळ चौक आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते, त्याची पाऊस संपल्यानंतर दुरुस्ती करून रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल.
- अविनाश कामठे, उपशाखा अभियंता, पथविभाग, पालिका
मागिल काही महिन्यांपासून फ्यूज उडत असून, विद्युत खांबावर स्फोट होऊन जाळ होतो. विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान होत आहे. विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने सोसायट्यांना जनरेटरसाठी डिझेलचा खर्च वाढला आहे. महावितरणने तातडीने विद्युतपुरवठा सुरळीत करून नागरिकांची गैरसोय दूर करावी.
- अशोक विंचनकर, हांडेवाडी रस्ता
Web Title: Pit Water Road Vehicle Driver Dangerous
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..