esakal | प्रार्थना स्थळे खुली होतील, पण स्मशानभुमी बंदीचे काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Baba-Adhav

प्रार्थना स्थळे खुली होतील, पण स्मशानभुमी बंदीचे काय?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: ‘‘प्रार्थना स्थळे खुली करणाच्या आंदोलनाबरोबरच शेवटचा श्वास संपल्यानंतर तरी कुणाच्या वाट्याला भेदभाव येणार नाही आणि जातीवरून कुणाचे प्रेत स्मशानभूमीत अडवले जाणार नाही, यासाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आग्रह धरला पाहिजे,’’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक व राष्ट्रीय एकात्मता समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

विविध पक्ष संघटनांकडून सध्या प्रार्थना स्थळे खुली करण्यासाठी आग्रह सुरू आहे. त्यासाठी आंदोलने केली जात आहेत. परंतु, त्याच वेळी धर्मातील भेदभाव कायम आहे. माणूस गेल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याच्या जागेमध्ये सुद्धा जातीनिहाय प्रवेश बंदी ठरवली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात माळशिरस येथे दलित सरपंचाच्या भावाला स्मशानभूमीत प्रवेश नाकारला गेला.

नाइलाजाने त्याचे प्रेत ग्रामपंचायतीसमोर मोकळ्या जागेत जाळावे लागले. हा भेदभाव कायम असून तो दूर करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. मंदिर, मशीद लोकांच्या दबाव आणि पक्ष संघटनांच्या आंदोलनाने खुली होतील. परंतु, जातीच्या भेदभावाचे नावाने होणारा अन्याय थांबवण्याची जबाबदारी सार्वजनिक जीवनामध्ये वावरणाऱ्या पक्ष व संघटनांची असल्याचे डॉ. आढाव यांनी सांगितले.

loading image
go to top