Bedse Caves : पुणे परिसर दर्शन : बेडसे लेणी

लोणावळा भागात असलेल्या अनेक लेण्यांमधील एक सुंदर लेणी समूह म्हणजे बेडसे लेणी. मुंबई-पुणे महामार्गावरून पवना धरणाकडे जाताना बेडसे हे गाव लागते.
Pune Bedse Caves
Pune Bedse Cavessakal
Updated on
Summary

लोणावळा भागात असलेल्या अनेक लेण्यांमधील एक सुंदर लेणी समूह म्हणजे बेडसे लेणी. मुंबई-पुणे महामार्गावरून पवना धरणाकडे जाताना बेडसे हे गाव लागते.

लोणावळा भागात असलेल्या अनेक लेण्यांमधील एक सुंदर लेणी समूह म्हणजे बेडसे लेणी. मुंबई-पुणे महामार्गावरून पवना धरणाकडे जाताना बेडसे हे गाव लागते. तिथेच डोंगरात १५० मीटर पसरलेल्या खडकात ही लेणी खोदलेली आहेत. साधारण इसवी सन पूर्व पहिल्या ते इसवी सन दुसऱ्या शतकापर्यंत ही लेणी खोदली गेलेली आहेत. ही बौद्ध लेणी हिनयान पंथातील आहेत. भव्य चैत्यगृह, विहार, वेगवेगळे स्तूप आणि पाण्याची टाकी असा समूह आहे.

चैत्यगृह २८ फूट उंच असून त्याचा व्हरांडा किंवा सज्जा चार खांबांवर तोलून धरल्याप्रमाणे दिसतो. सज्जातील खांबांच्या हार्मिकेवर हत्ती, घोडे आणि नीलगाय कोरलेली असून त्यावर युगुल शिल्पे आहेत. नीलगाय घोड्याप्रमाणे दिसत असली तरी तिच्या कंठामधला मणी ती नीलगाय असल्याचे दर्शवतो. युगुलांच्या अंगावर वस्त्र आणि दागिने सूक्ष्मरितीने कोरलेले आहेत. सज्जातून चैत्यगृहात जाण्यासाठी पिंपळ पानाच्या आकाराची एक कमान आहे. त्याच्याखाली अजून तीन कमानी कोरलेल्या आहेत. त्यातल्या दोन कमानीमधून आतमध्ये जाता येते. यावर पाने आणि फुलांची वेलबुट्टी कोरलेली आहे. एका कमानीला सुंदर दगडी जाळी कोरली आहे. सज्जामध्ये बाकी ठिकाणी चैत्यकमानी आणि वेदिका पट्टीचे नक्षीकाम कोरलेले दिसून येते.

चैत्यगृह हे हत्तीच्या पाठीच्या किंवा अंबारीच्या आकाराचे असून त्याच्यामध्ये बाजूला चौकोनी खांब आहेत. त्या खांबांच्या वर पूर्वी लाकडी फासळ्या होत्या, त्या आता चोरीस गेल्या असे म्हटले जाते. भव्य स्तूप आहे. स्तूपाच्या हार्मिकेवर खालच्या बाजूला उमललेले कमळ सुंदररीत्या कोरलेले आहे. या लेण्यांमध्ये पूर्वी चित्रकाम केलेले होते, ज्याचा थोडासा शिल्लक भाग बघता येतो. चैत्यगृहाच्या बाहेर काही स्मारक स्तूप आहेत. तसेच, बाजूला एक मोठा व्हरांडा खोदलाय. याची रचना गजपृष्ठाप्रमाणे आहे.

आतील गोलाकार भिंतीमध्ये अनेक विहार खोदलेले आहेत. बेडसे इथले स्तंभ मौर्य शैलीतले आहेत किंवा त्यांना ‘पर्सिपोलिटन’ शैलीचे स्तंभ असे म्हटले जाते. ‘पार्सीपोलीस’ हे इराणमधील एक प्राचीन शहर होते. त्यावरून त्यावेळेला इराणशी व्यापारी संबंध होता असे दिसून येते. तसेच एका खोलीवर एक शिलालेख आहे ज्यांच्यामध्ये ‘नाशिक येथील श्रेष्ठी आनंदच्या मुलाने या लेण्याचे दान दिले’ असे कोरलेले आहे. त्यामुळे नाशिक शहराचा उल्लेख इतक्या जुन्या लेण्यांमध्ये केल्याचे दिसून येते.

काय पहाल?

लेणी समूह, चैत्यगृहाचा व्हरांडा, त्यावरील शिल्प, खांबाची रचना, चैत्यगृह, स्तूप, स्मारक स्तूप आणि विहार

कसे पोहचाल

मळवलीवरून किंवा कामशेतवरून जीप आणि रिक्षाने जाता येते किंवा स्वतःच्या वाहनानेही जाता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com