Dilip Walse Patil
sakal
मंचर - 'श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील दरडप्रवण भीमाशंकरवाडी येथील ९६ बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सव्र्हे क्रमांक १ मध्ये हे पुनर्वसन करण्यात येणार असून, त्यासाठी आदर्श पुनर्वसन आराखड्यासही मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला ५०० चौरस फुटाचा भूखंड मिळणार. याबाबतचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने गुरुवारी (ता. ३) जारी केला आहे.' अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.