आळंदीत प्रांताधिकारी यांची वारी नियोजन आढावा बैठक

Planning review meeting of Alandi provincial office
Planning review meeting of Alandi provincial office

आळंदी - आषाढी वारी सोहळ्यात सोयीसुविधा देताना शासकिय यंत्रणांचे नियोजन सुक्ष्म पद्धतीने हवे. नियोजनात कोणी कमी पडले आणि दुर्घटना घडली तर तत्काळ त्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा सज्जड इशारा आज खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी यात्रा नियोजनाच्या आळंदीत झालेल्या आढावा बैठकीत विविध शासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांना दिला. तर आळंदी पालिकेचे यात्रा नियोजन निट नसल्याने गटविकास अधिकारी आणि पंचायत स्तरावर अधिकाऱ्यांची बैठक घेवून स्वतंत्र यंत्रणा राबविली जाईल. याचबरोबर यात्रा काळासाठी चाकण खेड, जुन्नर पालिकेची यंत्रणा आणि त्यापैकी एका मुख्याधिकाऱ्यांची आळंदीसाठी नेमणूक केली जाईल असे प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

आज दुपारी आळंदी पालिकेत प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजनाची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रभारी तहसिलदार रविंद्र सबनिस, पोलिस उपविभागीय अधिकारी राम पठारे, आळंदी देवस्थानचे सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, आळंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक दत्तात्रय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रांताधिकारी श्री. प्रसाद यांनी पालिकेची यात्रेच्या दृष्टिने तयार चांगली नसल्याने नाराजी व्यक्त केली. तर नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांच्या नगरसेविकांनीही पालिका प्रशासन आरोग्य सेवा देण्यात कमी पडल्याची टिका केली.

यावेळी प्रांताधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, आळंदीत लाखोंच्या संख्येने भाविक वारकरी येत आहे. भाविकांना सुविधा देण्यात कोणतीही शासकिय यंत्रणा कमी पडू नये यासाठी जिल्हाधिकारीस्तरापासून ते पालिका स्तरावर बैठक आयोजित केल्या. 

मात्र आजही अनेक शासकिय यंत्रणा तयारीत कमी असल्याचे दिसून येत आहे. तरि ज्या विभागाला मनुष्यबळ कमी पडेल त्यांना ते पुरविण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र ऐन यात्रा कालावधित जर एखादी दुर्घटना घडली तर संबंधित विभागाला जबाबदार धरून त्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. यात्रा काळासाठी पालिकेकडे यंत्रणा कमी असल्याने चाकण, खेड आणि जु्न्नर पालिकेची मदत घेतली जाईल. याचबरोबर एक जादाचा मुख्याधिकारी यात्रा काळात नेमणूक केली जाईल. आळंदी पोलिस ठाण्यात निंयत्रण ठेवण्यासाठी सिसीटिव्ही यंत्रणा अद्ययावत ठेवून महसूल, पोलिस आणि पालिका यांचे पोलिस ठाण्यात स्वतंत्रपणे केंद्रिय नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. यात्रा काळात चेंगराचेंगरी होवू नये यासाठी शहर अतिक्रमणमुक्त आणि हातगाड्या फिरत्या विक्रेत्यांवर बंदी करावी. अन्यथा हातगाड्या जप्त करून पालिकेत जमा करून यात्रा पार पडल्यावर १० जुलैला त्या संबंधित विक्रेत्याच्या ताब्यात द्याव्यात. २९ जुनपर्यंत ही कारवाईपालिकेन पूर्ण करावी.पालखीमार्गावर इंचभरही अतिक्रमण नको. रस्त्यावर बोर्ड, टेबल सगळे काढा. वेळ पडल्यास संबंधित दुकान यात्रा काळासाठी सक्तीने बंद ठेवा. डेंगीच्या पार्श्वभूमिवर शहरात धुरळणी सारखी करा. आरोग्य विभागाचे वेळापत्रक बनवून ते नगरसेवकांनाही माहित करून द्या. एकंदर पालिका यात्रा नियोजनात कमी पडत असल्याचे चित्र असल्याचे सांगण्यास प्रांताधिकारी विसरले नाहीत. सर्व कार्यालयातील अधिका-यांनी सर्वसामान्य लोकांनी केलेल्या फोन किंवा मोबाईलला उत्तर तत्काळ द्यावे.शहरात बुधवारी (ता. २७) पासून पालिकेने अंधार असलेल्या ठिकाणी विजेची व्यवस्था करावी. २ जुलैपर्यंत हे काम पूर्ण करावे की आळंदीत दिवाळी असल्याचे चित्र हवे. शहरातील रस्त्यांची पाहणी नगराध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयु

बांधकाम विभागाने संयुक्तपणे करून काम तत्काळ पूर्ण करावे. ३० जुनपर्यंत शहरातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी करावी. अपघात होणार नाही आणि अन्नपदार्थातून विषबाधा होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. अन्यथा हॉटेलवर कारवाई करावी असे आदेश श्री. प्रसाद यांनी आजच्या बैठकित दिले.

महत्वाचे आदेश...

  • २९ जुनपर्यंत अतिक्रमण काढणे आणि हातगाड्यांवर कारवाईचे आदेश.
  • यात्रा काळासाठी जादाचा मुख्याधिकारी देणार.
  • सुलभ शौचालयांची दुरूस्ती आणि स्वच्छता ३० जुनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश.
  • २ जुलैपर्यंत आळंदीत सर्व रस्त्यांवर पथदिवे सुरू करा.
  • ३० जूनपर्यंत महाद्वार आणि प्रदक्षिणा रस्त्यांसह प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश.
  • मंदिर प्रवेशाचे पास ४ जुलैपासून वाटप करावे.
  • पासची संख्या देवस्थानने नियंत्रित करावी.
  • पालिकेचे नियोजन निट नाही म्हणून ग्रामपंचायत स्तरावर मदत घेण्यासाठी ३० जुनला गटविकास अधिका-यांची बैठक घेणार.
  • हातगाड्या आणि अतिक्रमण कारवाई २९ जुनपर्यं कारवाई पूर्ण करण्याचे आदेश.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com