नवउद्योजकांसाठी ऑस्ट्रेलियात व्यासपीठ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

संस्थेचे मूळ कार्य

  • उद्योजकांना मोफत प्रशिक्षण
  • उद्योगाच्या गरजेनुसार नवीन क्षमता प्राप्त करण्यासाठी मदत करते
  • ‘इंटर्नशिप’ आणि ‘ॲप्रेंटीस प्रोग्राम’मध्ये प्रवेशासाठी मदत 
  • व्यावसायिक नेटवर्क स्थापित करणे

पुणे - ऑस्ट्रेलियात शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी व नवउद्योजकांसाठी ‘महाराष्ट्र बिझनेस अँड प्रोफेशनल कौन्सिल’ (एमबीपीसी) ऑस्ट्रेलिया या संघटनेची स्थापना केली आहे. त्याद्वारे विद्यार्थी आणि नवउद्योजकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील किरण हुरकडली यांच्या पुढाकाराने ही संघटना स्थापन झाली आहे.‘‘या संघटनेमार्फत आम्ही शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आलेल्यांना करिअरसंबंधित मार्गदर्शनाबरोबरच राहण्याची सोय करण्यात येते,’’ अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष किरण हुरकडली यांनी दिली.

संघटनेमध्ये सुमारे ४५० सदस्य आहेत. नवउद्योजकांसाठी मंथन सत्रे, प्रकल्पांची ओळख करणे, क्षमता निर्माण आणि संपर्क विकास, क्‍लस्टर डेव्हलपमेंटसारखे उपक्रम राबविण्यात येतात, असे हुरकडली यांनी सांगितले.

मी इंटिरिअर डिझायनर आहे. माझा हा व्यवसाय वाढविण्यासाठी एमबीपीसी या व्यासपीठाचा मला फायदा झाला असून, आज कित्येक प्रकल्पांसाठी मी काम करीत आहे.
- रेश्‍मी गोरे, इंटिरिअर डिझायनर

शिक्षणासाठी मेलबर्नमध्ये आलो. तेथे मला संघटनेबाबत समजले. या संघटनेमधील सर्व सदस्य एकत्रित सगळे भारतीय सण साजरे करतात. यामुळे मी भारतातच आहे, असे नेहमी वाटते.
- आदित्य पुरोहित, मेलबर्न येथील भारतीय विद्यार्थी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The platform for newbusiness to Australia