esakal | पुणे रेल्वे स्थानकावर ३१ मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट बंद

बोलून बातमी शोधा

पुणे रेल्वे स्थानकावर ३१ मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट बंद
पुणे रेल्वे स्थानकावर ३१ मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट बंद
sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ३१ मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिट दिले जाणार नाही, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच या काळात प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे रेल्वे प्रशासनाने हे निर्बंध लागू केले आहेत. स्थाकावर होणारी गर्दी टाळणे, हा त्यामागे उद्देश आहे. त्यामुळेच ३१ मे पर्यंत प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकिट दिले जाणार नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, लहान मुले यांच्या प्रवासाच्या मदतीसाठी जाणाऱ्यांना प्लॅटफॉर्म तिकिट दिले जाणार आहे. कोल्हापूर, मिरज, सांगली स्थानकांवरही प्लॅटफॉर्म तिकिट ५० रुपयांना असेल. उर्वरित स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट १० रुपयांना उपलब्ध असेल, असे मध्य रेल्वेचे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी कळविले आहे.

हेही वाचा: दौंड येथे रेमडेसिवीर विक्रीप्रकरणी तिघांना अटक; 9 इंजेक्शन जप्त

प्रवाशांभावी चार गाड्या रद्द

कोरोनामुळे प्रवासी संख्या कमी असल्यामुळे हजरत निजामुद्दीन- पुणे आणि पुणे - हजारत निजामुद्दीन एक्स्प्रेस, हबीबगंज - पुणे साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस आणि पुणे - हबीबगंज साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस ३ आणि ४ मे पासून पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्यात आली आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान, सुरू असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी प्रवाशांनी करावी. मास्क नसलेल्या प्रवाशांना रेल्वेत प्रवेश दिला जाणार नाही, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.