'अण्णाभाऊंना लोकशाहीर उपाधी लावण्याआधी मी त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणेन!'

Nandesh_Umap
Nandesh_Umap

पुणे : अण्णाभाऊ साठे यांना 'लोकशाहीर' ही उपाधी लावण्याआधी त्यांना 'स्वातंत्र्यसैनिक' ही उपाधी लावणे अधिक संयुक्तिक मानतो. अण्णाभाऊंनी त्यांच्या पोवाड्यांमधून डफलीवर थाप मारुन संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत क्रांतीचे जे रणशिंंग फुंकले त्याला तोड नाही, असे उद्गार लोककलाकार आणि पार्श्वगायक नंदेश उमप यांनी व्यक्त केले. 

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त शुक्रवारी (ता.३१) संवाद पुणे आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदेश उमप यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मनित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, उपमहापाैर सरस्वती शेडगे, संवाद पुणेचे सुनील महाजन, एनवायसीएमचे चेअरमन आणि समर्थ युवा फाैऊडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, सचिन ईटकर, निकिता मोघे आणि पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डाॅ. सुनील भणगे आदी मान्यवर उपस्थित होते. 

नंदेश उमप म्हणाले की, अण्णाभाऊंनी विपुल साहित्य निर्मितीद्वारे त्यावेळी समाजाला दिशादर्शनाचेच काम केले. आजही माझ्यासारख्या कलाकाराला अण्णाभाऊंचे पोवाडे सादर करताना रोमांचीत व्हायला होते, ही त्यांच्या शब्दांचीच ताकद म्हणावी लागेल. अण्णाभाऊंच्या विचारांची खोली आणि द्विव्यदृष्टीचा अंदाज केवळ त्यांचे साहित्याचे वरवर वाचन करून येणार नाही. माझे बाबा विठ्ठल उमप आणि अण्णा यांच्यातील मैत्रीतील गोफ मी खूप जवळून अनुभवले आहेत. बाबांना एखाद्यावेळेस अण्णांच्या भेटीला जाणे न जमल्यास नायगांवपर्यंत बाबांच्या भेटीला अण्णा चालत यायचे. 

कार्यक्रम आयोजनामागची भूमिका संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी विशद केली, तर समर्थ युवा फाैऊडेशनचे राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुणे मनपाचे अध्यक्ष हेमंत रासने, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर, उपमहापाैर सरस्वती शेंंडगे, सचिन ईटकर आदी मान्यवरांनी देखील थोडक्यात मनोगत व्यक्त केली. 

हा कार्यक्रम करोनाच्या पार्श्वभूमीवर झाल्याने शासनातर्फे आखून दिलेल्या शासकीय नियमातच संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. तसेच सांस्कृतिक पुणेच्या फेसबुक आणि यु-ट्युबवरून देखील याचे प्रत्यक्ष प्रक्षेपण करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com