Pune Crime : प्लाॅटिंगमध्ये लघुशंका का करतोस म्हणून हटकले; 'त्या' तिघांनी वॉचमनच्या बायकोचा जीवच घेतला

Pune Crime : शीतल चव्हाण असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सतीश लोखंडे, अजय मुंढे, भानुदास शेलार या तिघांना अटक केली आहे.
watchman’s wife killed over minor confrontation in plot
watchman’s wife killed over minor confrontation in plotEsakal
Updated on

पुण्यातील थेऊर मध्ये लघुशंका करताना हटकल्याने तिघा जणांनी सुरक्षारक्षकासह त्याच्या पत्नीला दगडाने बेदम मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले होते. आता जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शीतल चव्हाण (29) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सतीश लोखंडे, अजय मुंढे, भानुदास शेलार या तिघांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com