पुणेकर PM मोदींना देणार मानाचा फेटा; ऑस्ट्रेलियन डायमंड, सोन्याचा वापर | PM Modi In Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकर PM मोदींना देणार मानाचा फेटा; ऑस्ट्रेलियन डायमंड, सोन्याचा वापर

पंतप्रधान मोदींनी देण्यात येणाऱ्या या शाही फेट्याच्या मध्यभागात मोत्याच्या सूर्यफुलात शिवमुद्रा बसविण्यात आलीय.

पुणेकर PM मोदींना देणार मानाचा फेटा; ऑस्ट्रेलियन डायमंड, सोन्याचा वापर

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रविवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याची जोरदार तयारी पुणे प्रशासनाकडून चालली आहे. दरम्यान, मोदींच्या स्वागतासाठी पुणेकरही सज्ज झाले आहेत. पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश मुरुडकर यांच्याकडून मोदींसाठी शाही फेटा तयार करून घेतला आहे. ऑस्ट्रेलियन डायमंडचा वापर केलेल्या या फेट्याची आणखीही काही खास वैशिष्ट्ये आहेत.

ऐतिहासिक पुण्यनगरीत येणाऱ्या पंतप्रधानांसाठी फेटासुद्धा ऐतिहासिक असावा यासाठी फेट्याचे जवळपास २५ पॅटर्न पाहिल्याचं तो तयार करणारे गिरीश मुरुडकर यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांच्या विचार करुन आम्ही क्रीम विथ रेड कापडाचा वापर केला आहे. तर फेट्यामध्ये उच्च दर्जाचे असे ऑस्ट्रेलियन डायमंड वापरण्यात आलेत. फेट्याच्या वरच्या बाजूला गोल्ड प्लेट लावली असून त्याला सोन्याचं पाणी दिलं असल्याचं सांगण्यात आलं.

मोदींनी देण्यात येणाऱ्या या शाही फेट्याच्या मध्यभागात मोत्याच्या सूर्यफुलात शिवमुद्रा बसविण्यात आलीय. सूर्यफुल नेहमी तेजाकडे, सूर्याकडे पाहत असते, याच थीमवर फेटा तयार करण्यात आल्याची माहिती मुरुडकर यांनी दिली. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. यापार्श्वभूमीवर फेटा तयार करताना तो वजनाला हलका आणि डोक्याला जास्त गरम होणार नाही अशा पद्धतीने तयार करण्यता आला आहे. फेट्यासाठी रेशमी आणि कॉटनचे कापड वापरण्यात आलंय. तसंच फेट्यामधून हवा आत-बाहेर जावी, मोदींना त्रास होवू नये, यासाठी मध्यभागात जाळीही तयार केल्याचं त्यांनी सांगितले.

हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी पुणे पोलिस दलाचीही संपुर्ण तयारी झाली असून रविवारी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राज्य राखीव पोलिस दल, फोर्सवनच्या कंपन्यांसह शहर पोलिस दलातील तब्बल 2200 पोलिस बंदोबस्तावर असणार असून पोलिसांकडून मागील तीन दिवसांपासून कार्यक्रम, सभेसह विविध ठिकाणी कसून तपासणी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांचे रविवारी सकाळी दहा वाजता लोहगाव येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते शिवाजीनगर सिंचनभवनाच्या मैदानावर हेलिकॉप्टरने दाखल होणार आहेत. तेथून ते वाहनातुन गरवारे महाविद्याल येथे येतील. तेथून ते मेट्रोने आनंदनगर येथील कार्यक्रमाला जाणार आहेत. एमआयटी येथील सभेनंतर ते लवळे येथे जाणार आहेत.

Web Title: Pm Modi In Pune A Turban Australian Diamond With Gold

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top