PM Modi Pune Visit : मागच्या भेटीत पुण्यासाठी मोदींनी केल्या 'या' घोषणा; उद्याच्या दौऱ्यात काय मिळणार?

PM Modi Pune Visit announcement in Pune last year Lokmanya tilak award 2023 pune metro
PM Modi Pune Visit announcement in Pune last year Lokmanya tilak award 2023 pune metro

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदींनी उद्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणे तसेच शहरातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनीच यापूर्वी वनाज ते गरवारे कॉलेज या पुण्यातील पहिल्या मेट्रो मार्गातील एका टप्प्याचं उद्घाटन केलं होतं. यानंतर आता ते निगडी ते शिवाजीनगर या मार्गावरील फुगेवाडी ते शिवाजीनगर कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन टप्याचं उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी ६ मार्च २०२२ रोजी पुण्यातील मेट्रोचं लोकार्पण केलं होतं. यावेळी मोदींनी पुणे मेट्रोतून विद्यार्थ्यांसोबत मेट्रो प्रवास देखील केला होता. इतकेच नाही तर पुण्यात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी काही घोषणा देखील केल्या होत्या. या घोषणांची पुर्तता किती प्रणाणात झाली हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

PM Modi Pune Visit announcement in Pune last year Lokmanya tilak award 2023 pune metro
Maharashtra Politics : अधिवेशन संपताच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार? भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येही अंतर्गत खांदेपालट

मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी ६ मार्च २०२२ रोजी केलेल्या भाषणात गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर पुण्यातील मुळा आणि मुठा नदी विकसीत केली जाईल. तसेच ४४ किलोमीटरच्या या नद्यांपैकी ९ किलोमीटर लांबीच्या नद्यांचं विकासाचं काम सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. इतकेच नाही तर पुणेकरांसाठी नद्यांभोवती नदीकाठ बनवला जाईल, तसेच जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅकसह हरितपट्टे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं होतं.

पुण्यातील मुळा-मुठा नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी ११०० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु होत असल्याचे, तसेच या प्रकल्पासाठी केंद्र मदत करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आज मुळा-मुठेसाठी ११०० कोटींच्या प्रोजक्टवर काम सुरु होत आहे, असं पंतप्रधान मोदी भाषणात म्हणाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वर्षातून एक दिवस नदी उत्सव साजरा केला पाहिजे, असंही पुणेकरांना सांगितलं होतं.

PM Modi Pune Visit announcement in Pune last year Lokmanya tilak award 2023 pune metro
PM Modi Pune Visit : मोदींचा कार्यक्रम की संसदेतील 'ते' विधेयक; पवारांसमोरचा पेच सुटला?

उद्या पुणेकरांना काय मिळणार

पुण्यात मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वेस्ट टू एनर्जी मशिचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १२८० हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली २६५० हून अधिक घरे देखील उद्या हस्तांतरित करतील.

यासोबतच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येत असलेली सुमारे ११९० घरे आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येत असलेली ६४०० हून अधिक घरे यांची पायाभरणी देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com