पंतप्रधानांच्या आगमन बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या अंगावर एकाने घातली कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येरवडा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावरुन राजभवन येथे आगमन होणार होते. त्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानिमित्त रस्त्यात बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यास दुचाकीस्वाराने शिवीगाळ करीत अंगावर गाडी घालत त्यांना जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकास अटक केली आहे. 

पाच वर्षांनंतर पुन्हा जळाला संसार; पुण्यातल्या महिलेची करुण कहाणी   
 

अब्दुल गुलाम रसुल पटेल (वय 38, रा.नागपुर चाळ, येरवडा) असे अटक केलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सागर कोतवाल यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : शिपायाने मागितली 26 हजारांची लाच; अन् अडकला...​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येरवडा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावरुन राजभवन येथे आगमन होणार होते. त्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फिर्यादी यांची नेमणूक नागपुर चाळ येथील विमानतळ रस्त्यावरील अभिजित हॉटेलसमोर होती. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पटेल हा त्याच्या दुचाकीवरुन तेथे आला. त्यावेळी फिर्यादी व पटेल यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाले. त्यानंतर त्याने फिर्यादी व महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक तांदळे यांच्याशी हुज्जत घालीत शिवीगाळ केली. अचानक गाडी सुरु करून फिर्यादी व तांदळे यांच्या अंगावर घातली. त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली. 

पुणे : अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला विवाह; गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one man hit policemen by car during the Prime Minister arrival