पंतप्रधान मोदी पुणेकरांशी साधणार संवाद; लोकमान्य टिळक शताब्दीनिमित्त वेबीनार!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

- डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे वेबीनार
- 7 ऑक्‍टोबरला कार्यक्रम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि 'आयसीसीआर'तर्फे लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या वेबीनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'आत्मनिर्भर भारत आणि नवे शैक्षणिक धोरण' या विषयावर संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम 7 ऑक्‍टोबर रोजी दुपारी साडे चार वाजता होणार आहे.

महत्त्वाची बातमी : आंबेगावात घेता येणार निसर्गोपचार पद्धतीने उपचार

7 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सोसायटीच्या सर्व शाळा, महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, पालकांसह इतरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी केले आहे. दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले होते, त्यानंतर आता नरेंद्र मोदी हे यामध्ये संबोधित करणार आहेत.

या वेबिनारसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, त्यांना कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी कार्यक्रमाची रूपरेषा व लिंक दोन पाठवण्यात येणार आहे. https://forms.gle/5yaUMHNur9hxd4bV7 या लिंकवर माहिती भरून नोंदणी करावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi will hold dialogue on occasion of Lokmanya Tilak centenary