
पुणे - ‘आत्तापर्यंत कोणत्याही राज्याला एका वर्षात जेवढी घरे मिळाली नाहीत, तेवढी महाराष्ट्राला मिळाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम आहे. राज्यातील प्रत्येकाला पक्के घर मिळावे, कुणीही घरापासून वंचित राहू नये म्हणून नियमांमध्ये शिथिलता आणली,’ असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी केले, तसेच पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी १३ लाख २९ हजार ६७८ घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी केली.