Pune News : पुणे महापालिकेच्या निविदेत ठेकेदारांचे दबावतंत्र; हडपसर कचरा प्रकल्पाच्या शेडसाठी वाद

Hadapsar waste project shed tender controversy : हडपसर येथील २०० टन कचरा प्रकल्पावर शेड उभारण्यासाठी साडे सात कोटींची निविदा काढली असून पात्रतेवरून वाद निर्माण झाला आहे. अपात्र ठेकेदाराला पात्र करण्यासाठी दबाव असल्याची तक्रार; प्रशासनाने कागदपत्रांची छाननी सुरू असल्याचे स्पष्ट केले.
Hadapsar waste project shed tender controversy

Hadapsar waste project shed tender controversy

sakal

Updated on

पुणे : हडपसर येथील २०० टन कचरा प्रकल्पाच्या वर पत्र्याचे शेड मारण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे साडे सात कोटी रुपयांची निविदा काढली आहे. हे काम स्थापत्य अभियांत्रिकीचे असताना ते यांत्रिकी अभियांत्रिकीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला मिळावे यासाठी खटाटोप सुरु आहे. या निविदेसाठी पाच पैकी चार ठेकेदार पात्र होत असून हा ‘विशेष कामगिरी’ करणारा ठेकेदार अपात्र होत असूनही त्याबाबतचा निर्णय अधिकारी राजकीय दबावामुळे घेऊ शकलेले नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com