The PMC Abhay Yojna has recovered only ₹157 crore in a month, raising concerns over the fate of the scheme.
पुणे : शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, भूसंपादनाची कामे मार्गी लागावीत यासाठी महापालिकेने मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी अभय योजना सुरु केली आहे. या योजनेस एक महिना होत आला, पण त्यातून केवळ १५७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. मोठे थकबाकीदार अजूनही पैसे भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच मिळकतकर विभागाकडूनही थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात नसल्याने ही योजना फसण्याच्या मार्गावर आहे.