PMC Election : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

PMC Update : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप यादी आणि हरकती सूचनांवर विचार करून १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.
PMC Election

PMC Election

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आज (ता. १४) जाहीर केला आहे. ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून, त्यावरील हरकती सूचनांवर विचार करून १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीवर काम सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com