

Sadhu Vaswani Bridge Work Hits Technical Snag; PMC Supports Contractor
sakal
पुणे: कोरेगाव पार्कमधील साधू वासवानी पुलाच्या संथगतीने होत असलेल्या कामाबाबत पोलिस आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराची पाठराखण केली आहे. संबंधित कामास होणाऱ्या विलंबास रेल्वेच्या विविध परवानग्या, जलवाहिन्यांची कामे व अन्य तांत्रिक अडचणी कारणीभूत आहेत, अशी सावध भूमिका घेत महापालिका प्रशासनाकडून पोलिस आयुक्तांना पत्र पाठविले जाणार आहे.