पुणे महापालिकेत दिसणार नाही जीन्स, टी-शर्ट; गाईडलाईन्स जाहीर

pune pmc office
pune pmc office

पुणे - मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफॉर्म बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बरीच चर्चा झाली होती. यावर काहींनी नाराजीसुद्धा व्यक्त केली होती. आता मुंबईनंतर पुण्याच्या महानगरपालिकेनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड निश्चित केला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स, टीशर्ट घालता येणार नाही. तसंच आठवड्यातून एक दिवस खादीचे कपडे घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

पीएमसीने गुरुवारी आदेश जारी केला आहे. यामध्ये म्हटलं आहे की, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना टीशर्ट किंवा जीन्स घालून कार्यालयात येता येणार नाही. तसंच आठवड्यातून किमान एक दिवस खादीचे कपडे घालून येण्याची विनंतीही करण्यात आली आहे. 

अतिरिक्त पालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबत आदेश दिले असून, त्यात म्हटलं आहे की, कार्यालयात निवडून आलेले प्रतिनिधी, खासगी आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी भेट देत असतात. यावेळी कार्यालयातील कर्मचारी हे पीएमसीचे प्रतिनिधी म्हणून संबंधितांशी बोलत असतात. यावेळी कार्यालयात आलेल्यांवर पीएमसीची एक वेगळी छाप पडले. कर्मचाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत योग्य त्या पोषाखात हजर राहण्याची काळजी घ्यावी असंही आदेशात म्हटलं आहे. 

ड्रेस कोडसाठी गाईडलाईन्स

  • कर्मचाऱ्यांनी कपडे घालताना सरकारी स्टाफला साजेसा पोषाख घालावा
  • पुरुषांनी शर्ट, पॅंट, ट्राउजर पँट घालावी. तसंच झगमगणारे आणि गडद रंगाचे कपडे टाळावेत.
  • महिलांनी सलवार, साडी, चुडीदार दुपट्ट्यासह कुर्ता परिधान करावा असंही आदेशात म्हटलं आहे. 
  • कार्यालयात टी शर्ट आणि जीन्स घालून कर्मचाऱ्यांना येता येणार नाही.
  • आठवड्यातून किमान एकदा खादीचे कपडे घालावेत.
  • तसंच कार्यालयात कर्मचाऱ्यांनी फूटवेअर घालतानाही नियम असून स्लिपर्सला बंदी असल्याचंही म्हटलं आहे. 
  • पुरुष शूज किंवा सँडल्स तर महिला चप्पल, सँडल किंवा शूज घालू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com