
पुणे : ज्या कर्मचाऱ्यांनी टीडीएससह आधार व पॅन लिंक न केल्याने पुणे महापालिकेच्या प्राप्तिकर विभागाने त्यांच्याकडून दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांची वसुली होणार असून, यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही रक्कम वसूल करू नये व महापालिका प्रशासनाने पगार अडवू नयेत, अशी मागणी पीएमसी एम्प्लॉइज युनियनने अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे केली आहे. महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने आणि महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराच्या चुकीमुळे हा भुर्दंड लागला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.