PMC Budget 2021-2022 : 8 हजार 370 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर; पुणेकरांना काय मिळणार?

PMC Budget 2021-2021.jpg
PMC Budget 2021-2021.jpg

पुणे : कोरोनासारख्या साथीच्या आजारावर कायमस्वरुपी उपाय म्हणून आर्थिक व्यवस्थाच सक्षम करताना, सार्वजनिक वाहूतक व्यवस्था , खाजगी वाहने आणि शहरातील महत्त्वाकांक्षी या प्रकल्पांना प्राधान्य देत, स्थायी समितीने तब्बल 8 हजार 730 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प2021-2022 सोमवारी सादर केला. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.  या आधी माहापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 7 हजार 650 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प त्यात 720 कोटी रुपायांची भर घालून रासणे यांनी हा अर्थसंकल्प 2021-2022 सादर केला.

महापालिकेच्या महापौर मुरलधीर मोहोळ यांच्या अध्यक्षते खाली सुरु असलेल्या ऑनलाईन सर्वसाधरण सभेत हा अर्थसंकल्प 2021-2022 सादर केला जात आहे.

स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची वैशिष्टये

प्रभावी महसूल वाढ
- मिळकतकरातील गळती थांबविणार.

 महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय या वर्षी सुरू होणार (अंदाजपत्रकातील तरतूद : १४६ कोटी रुपये)
- नानाजी देशमुख कॅन्सर रुग्णालय (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
- डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रात सुपर स्पेशालिटी युरॉलॉजी/युरो सर्जरी हॉस्पिटल (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये
- पाचही विभागांत अतिदक्षता विभाग सुरू होणार(अंदाजपत्रकातील तरतूद : ५ कोटी रुपये)
- मुकुंदराव लेले दवाखाना अद्ययावतीकरणअंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
- आरोग्य वर्धन प्रकल्प (अंदाजपत्रकातील तरतूद : ५ कोटी रुपये)
- ‘मधुकर बिडकर रक्तपेढी’ उभारणी अंतिम टप्प्यात (अंदाजपत्रकातील तरतूद : ७० लाख रुपये)
-आधुनिक तंत्रज्ञानाने हृदयरोग निदान (अंदाजपत्रकातील तरतूद : २ कोटी रुपये)
- स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी हृदयरोग चिकित्सा सुविधा (बालकांसाठी) (अंदाजपत्रकातील तरतूद : २ कोटी रुपये)
- स्तन आरोग्य तपासणी कार्यक्रम(अंदाजपत्रकातील तरतूद : ३ कोटी रुपये)

- मुकाबला कोरोनाचा (अंदाजपत्रकातील तरतूद : १० कोटी रुपये) 
- नवीन कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्ब्युलन्स (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
- पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना (अंदाजपत्रकातील तरतूद : ५० लाख रुपये)

गतिमान वाहतूक

  • डिसेंबर अखेरपर्यंत पाच टप्प्यांवर मेट्रो धावणार (अंदाजपत्रकातील तरतूद : ३ कोटी ५० लाख रुपये)
  • स्वारगेट-कात्रज, नगर रस्ता बीआरटी कार्यान्वित (अंदाजपत्रकातील तरतूद : ७० कोटी रुपये)
  • ‘राष्ट्रीय महामार्ग योजने’अंतर्गत नगर रस्त्यावर उड्डाण पूल
  • डी. पी. रस्ते आणि पूल खासगी सहभागातून (पीपीपी) विकसित करणार (अंदाजपत्रकातील तरतूद : १४१ कोटी रुपये)
  • पादचार्‍यांसाठी सिग्नल(अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी ५० लाख रुपये)

महत्त्वाच्या रस्त्यांसाठी तरतुदी

  • शिवणे-खराडी रस्ता(अंदाजपत्रकातील तरतूद : २८ कोटी रुपये)
  • कात्रज-कोंढवा रस्ता (अंदाजपत्रकातील तरतूद : ३५ कोटी रुपये)
  • बालभारती-पौड फाटा रस्ता (अंदाजपत्रकातील तरतूद : ७० लाख रुपये)
  • सक्षम सार्वजनिक वाहतूक (अंदाजपत्रकातील तरतूद : ८५ कोटी रुपये) 
     
  • मुख्य मार्गावर दर पाच मिनिटाला मिळेल बस
  • पुण्यात वातानुकूलित बसमध्ये दिवसभरात कुठेही प्रवास करा ‘फक्त १० रुपयांत’
  • ‘अटल योजने’त अवघ्या पाच रुपयांत पाच किमीचा प्रवास 

समान, शुद्ध पाणीपुरवठा (अंदाजपत्रकातील तरतूद : २८ कोटी रुपये) 

  • समान पाणीपुरवठा योजनेला गती
  • भामा-आसखेड योजना कार्यान्वित 
  • मुळशी धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी डीपीआर तयार करणे

नदीसुधारणा-काठ सौंदर्यीकरण 

  • पुण्यातील शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होणार 
  • समाविष्ट ११ गावांमध्ये मलवाहिन्या विकसित करणार (अंदाजपत्रकातील तरतूद : १२० कोटी रुपये)
  • साबरमतीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीकाठ विकसन(अंदाजपत्रकातील तरतूद : १०५ कोटी रुपये)
  • जांभुळवाडी तलावाचा पीपीपी तत्त्वावर पुनर्विकास (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
  • घनकचरा व्यवस्थापन (अंदाजपत्रकातील तरतूद : २ कोटी रुपये)

पर्यावरण संवर्धन

  • पर्यावरण विभागाअंतर्गत ‘हवामान बदल’ अभ्यास अंदाजपत्रकातील तरतूद : ५० लाख रुपये)
  • इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनन (अंदाजपत्रकातील तरतूद : ५० लाख रुपये)
  • सीएनजी पंपांची उभारणी (अंदाजपत्रकातील तरतूद : ५० लाख रुपये)
  • सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी (अंदाजपत्रकातील तरतूद : ५० लाख रुपये)
  • खासगी सहभागातून पुनर्विकास (पीपीपी)
  • महात्मा फुले मंडईचा पुनर्विकास (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
  • तुळशीबागेचा पुनर्विकास (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
  • सारसबाग आणि पं. नेहरू स्टेडियम परिसराचा एकत्रित पुनर्विकास (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
  • मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालयाचा पुनर्विकास (अंदाजपत्रकातील तरतूद : २ कोटी १० लाख रुपये)
  • के. के. मार्केटचा पुनर्विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षण

  • शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांना प्रोत्साहन
  • संत तुकाराम महाराज संगीत विद्यालयाचा कायापालट(अंदाजपत्रकातील तरतूद : ५० लाख रुपये)
  • श्री छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा कायापालट (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी १० लाख रुपये)
  • मनपा शाळांतील मैदाने विकसित करणार

खेळांसाठी सर्व काही

  • तालमींचा विकास करणार(अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
  • सदाशिव पेठेत क्रीडा संकुल (अंदाजपत्रकातील तरतूद : ३ कोटी रुपये)
  • क्रीडा महोत्सव (अंदाजपत्रकातील तरतूद : ३ कोटी रुपये)
  • खेळाला प्रोत्साहन

समाविष्ट गावे

  • समाविष्ट गावांतील विकासकामे
  • सर्वांसाठी परवडणारी घरे
  • प्रधानमंत्री आवास योजना (अंदाजपत्रकातील तरतूद : ७० कोटी रुपये)
  • चार गावांमध्ये होणार नगररचना योजना (टी. पी. स्किम)

‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प  (अंदाजपत्रकातील तरतूद : ५० कोटी रुपये)

शिवसृष्टी, स्मारके, वारसा प्रकल्प, सांस्कृतिक

  • शिवसृष्टी (अंदाजपत्रकातील तरतूद : २० कोटी ७० लाख रुपये)
  • जय गणेश सार्वजनिक गणेशोत्सव संग्रहालय  (अंदाजपत्रकातील तरतूद : २ कोटी रुपये)
  • आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
  • वारकरी सांस्कृतिक भवन(अंदाजपत्रकातील तरतूद : २ कोटी २० लाख रुपये)
  • हज हाउस (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी ५६ लाख रुपये)
  • स्वामी विवेकानंद राष्ट्रीय परिषद (अंदाजपत्रकातील तरतूद : ५० लाख रुपये)
  • वारसा स्थळांचा (हेरिटेज कॉरिडॉर) विकास (अंदाजपत्रकातील तरतूद : ५ कोटी रुपये)
  • आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष योजना(अंदाजपत्रकातील तरतूद : ५ लाख रुपये)

समाज कल्याणकारी योजना

विविध योजना

  • शहरात होणार १५ लाइट हाउस प्रकल्प (अंदाजपत्रकातील तरतूद : २ कोटी ८० लाख रुपये)
  • स्वयंरोजगार आणि प्रशिक्षण (अंदाजपत्रकातील तरतूद : २ कोटी रुपये)
  • शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
  • १५ क्षेत्रीय कार्यालयात महा-ई सेवा केंद्र(अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
  • सुशिक्षित बेरोजगारांसाठी (अंदाजपत्रकातील तरतूद : २ कोटी रुपये)
  • स्वयंसेवी संस्था/गणेश मंडळांसोबत सह-आयोजक कार्यक्रम (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
  • पत्रकार डी. आर. कुलकर्णी गृहनिर्माण संस्था प्रशिक्षण कार्यक्रम (अंदाजपत्रकातील तरतूद : १ कोटी रुपये)
  • संशोधकांना शिष्यवृत्ती (अंदाजपत्रकातील तरतूद : १० लाख रुपये)

उद्योग-व्यवसाय
गुंतवणूकदार सुविधा कक्ष स्थापन करणार(अंदाजपत्रकातील तरतूद : ५ लाख रुपये)

विद्युत
तीस हजार एलईडी दिवे बसविणार (अंदाजपत्रकातील तरतूद : ७ कोटी रुपये)

तीन विधानसभा मतदार संघात सीसीटीव्ही कॅमेरे (अंदाजपत्रकातील तरतूद : २ कोटी रुपये)


माहिती आणि तंत्रज्ञान

पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन आणि अतिक्रमण निर्मूलन विभाग (अंदाजपत्रकातील तरतूद : २ कोटी रुपये)

आपत्ती व्यवस्थापन

कामगार कल्याण
सातवा वेतन आयोग आणि विविध योजना

वसंतराव भागवत प्रशिक्षण प्रबोधिनी (अंदाजपत्रकातील तरतूद : ५० लाख रुपये) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com