Pune News : महापालिकेत समाविष्ट गावे, रस्त्यांना बूस्टर; १३ हजार ९९५ कोटीचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल १३ हजार ९९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे केला सादर.
naval kishore ram

naval kishore ram

sakal

Updated on

पुणे - समाविष्ट गावातील गंभीर होत जाणारा पायाभूत सुविधांचा प्रश्‍न, अपुऱ्या रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी याची गंभीर दखल घेत या समस्या निवारणासाठी भरावी तरतूद करत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल १३ हजार ९९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला.

एकीकडे अर्थसंकल्पाचा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल १ हजार ३७७ कोटी रुपयांनी फुगलेला असताना दुसरीकडे उत्पन्न वाढवताना प्रशानसाची चांगलीच दमछाक होत आहे. हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकीकडे समस्यांचे रौद्ररूप अन दुसरीकडे उत्पन्न वाढीचे आव्हान अशा कात्रीत महापालिका सापडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com