

PMC Makes Appointment Letters Mandatory for Contract Employees
Sakal
पुणे : पुणे महापालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नाही, वेतनचिठ्ठीही दिली जात नाही. शिवाय त्याला नियुक्तीपत्रही दिले जात नसल्याने पिळवणूक व आर्थिक फसवणूक होत आहे. हे प्रकार टाळण्यासाठी यापुढे ठेकेदाराने कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणे बंधनकारक केले आहे. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.