
पुणे : क्षेत्रीय कार्यालयस्तरावर झाडणकामासाठी कंत्राटी कामगार घेताना मुकादम, आरोग्य निरीक्षक संगनमताने या कामगारांकडून नोकरीवर लावण्यासाठी पैसे घेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाने हे प्रकार टाळण्यासाठी कंत्राटी कामगारांना कामावर घेण्यासाठी पैसे घेतले जात नाहीत. कोणत्याही गरजवंत कामगाराने आमिषाला बळी पडून पैसे देऊ नयेत असे आवाहन केले आहे. कंत्राटी कामगारांकडून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता.