
PMC News
Sakal
ब्रिजमोहन पाटील
पुणे : नागरिकांनी मिळकतकर थकविला की, त्याला लगेच दंड करणे, जप्तीची कारवाई करणे अशा पद्धतीने महापालिका कारवाई करते. मात्र, स्वतःच्या सदनिकांची देखभाल दुरुस्तीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असताना ती भरण्याकडे टाळाटाळ केली जात आहे. महापालिकेने पैसे भरावेत यासाठी सोसायट्यांकडून पत्रव्यवहार केला जात असला, तरी त्याला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जात आहेत. या थकबाकीमुळे सोसायट्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.