
PMC Malaria Control
Sakal
पुणे : मलेरिया रुग्णांचे लवकर निदान झाल्यास, त्यावर तातडीने उपचार करता येतात, तसेच रोगाच्या प्रसाराचा धोका कमी होतो. याकरिता महापालिका प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वेक्षण करते. प्रत्यक्ष सर्वेक्षणात वस्ती पातळीवर ताप आलेल्या रुग्णांचे रक्ताचे नमुने घेतले जातात, ते सकारात्मक आल्यास तत्काळ उपचार करण्यात येतात. मलेरिया विभागात पुरेशा मनुष्यबळाची नियुक्ती होईपर्यंत महापालिकेने ऑगस्टमध्ये २०० आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना मलेरिया तपासणी किटचे वाटप केले. त्यामुळे मलेरिया रुग्णांचे निदान जलद होण्यास मदत होत आहे.