
Heavy Rain Pune
Sakal
पुणे : महापालिकेने पावसाळी वाहिन्यांमधील गाळ काढल्याबाबत केलेला दावा गुरुवारी सायंकाळी शहरात झालेल्या जोरदार पावसाने पुन्हा एकदा खोडून काढला. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते, तर गुडघाभर पाण्यातून वाट शोधताना पादचारी व वाहनचालकांची अक्षरशः तारांबळ उडाली. वाहनांमध्ये पाणी गेल्याने अनेक वाहने बंद पडण्याच्या घटनेमुळे तर चालकांची आणखीनच दयनीय अवस्था झाल्याचे चित्र गुरुवारी सायंकाळी दिसून आले.