
PMC Elections 2025
Sakal
वडगाव शेरी : प्रस्तावित प्रभागरचनेत विमाननगर आणि खराडीचा भाग वाघोलीला जोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाघोलीतील इच्छुकांनी शहरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत देवदर्शन यात्रेचा बार उडवून दिला आहे. याकरिता कोट्यवधी रुपये खर्चून अनेक रेल्वे गाड्या त्यांनी आरक्षित केल्या आहेत. महापालिका निवडणुकीचा ‘ट्रेलर’च जर काही कोटींचा असेल, तर पिक्चर नक्कीच ‘बिग बजेट’ राहील, अशी चर्चा मतदारांमध्ये त्यामुळे रंगली आहे.