
पुणे - गेल्या दीड वर्षांपासून रखडलेली महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने या भरतीसाठी आता ११३ ऐवजी १७१ जागांना मंजुरी दिली आहे. या भरतीसाठी जानेवारी २०२४ मध्ये अर्ज केलेल्या २७ हजार ८७९ उमेदवारांचे अर्जही वैध धरले जाणार आहेत.