
घोरपडी : बी. टी. कवडे रस्त्यावरील नवीन उड्डाण पुलाखाली उभारण्यात येणारे उद्यान सध्या पूर्णपणे अडगळीत पडले आहे. उड्डाण पुलाच्या खालील जागेत सुंदर उद्यान विकसित होणार होते, त्यासाठी आणलेली मातीची चोरी होऊ लागली आहे, तसेच ती जागा आता कचरा, राडारोडा आणि झाडाझुडुपांनी व्यापली आहे.