PMC Makes GIS Tracking Mandatory for All Road Repair Works

PMC Makes GIS Tracking Mandatory for All Road Repair Works

Sakal

Pune News : खड्डेमुक्तीवर महापालिकेची कडक नजर; रस्ता दुरुस्तीची प्रत्येक नोंद आता जीआयएसवर अनिवार्य!

Pune GIS Monitoring : खड्डेमुक्त पुणे मोहिमेत पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेने आता रस्त्यांवरील प्रत्येक दुरुस्तीची माहिती जीआयएसवर अपलोड करणे अनिवार्य केले आहे. चुकीच्या नोंदी किंवा निष्काळजीपणाबाबत वरिष्ठांनाही जबाबदार धरले जाणार आहे.
Published on

पुणे : शहर खड्डेमुक्त करण्याचे दावे वारंवार केले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याची तक्रार नागरिक करत असताना, अखेर महानगरपालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कामांवर कडक लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. खड्डे बुजवण्याची आणि रीसर्फेसिंगची कामे नेमकी कुठे झाली याची पारदर्शक नोंद रहावी म्हणून रस्तानिहाय आणि रुंदीनिहाय माहिती जीआयएस प्रणालीमध्ये भरावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पथ विभागाला दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com