

Revenue Gridlock: PMC Awaits ₹1,886 Crore GST Compensation for 32 Merged Villages
sakal
पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी महापालिकेकडे निधीची चणचण आहे. तर दुसरीकडे या गावांमधून सरकारकडे जमा होणाऱ्या जीएसटीचा मोबदला महापालिकेला मिळत नाही. राज्य सरकारकडून याचा निर्णय घेतला जात नसल्याने तब्बल १८८६.६९ कोटी रुपयांची महापालिकेला प्रतीक्षा आहे. हा निधी मिळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेतच, पण महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचाही दबाव वाढणे आवश्यक आहे.