

Pune Municipal Corporation Election Rule
ESakal
निवडणूक प्रचार सुरू होताच पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने सज्जता दाखवली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान रॅली आणि सभांबाबत महापालिकेने कडक नियम लागू केले आहेत. जर कोणताही उमेदवार किंवा राजकीय पक्ष पूर्वपरवानगीशिवाय रस्त्यावर, चौकात किंवा मोकळ्या जागेत सभा आयोजित करत असेल तर त्यांच्याकडून परवाना शुल्काच्या दीड पट दंड आकारला जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.