पुण्यात डेंग्यूचे १४ दिवसात तब्बल ४० रुग्ण, महापालिका ॲक्शन मोडमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue patients

पुण्यात डेंग्यूचे १४ दिवसात तब्बल ४० रुग्ण, पालिका ॲक्शनमध्ये

पुणे : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शिवाय पुण्यात डेंग्यूचे रुग्णांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात नोंद करण्यात आली असून, १ जानेवारी पासून १४ जुलै पर्यंत १८२ डेंग्यूची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर, १ जुलै ते १४ जुलै पासून ४० नवीन डेंग्यूच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, या महिन्यात १७० संशयित रुग्ण आहेत.

वाढणाऱ्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आरोग्य विभागाकडून योग्य ती पावलं उचलली जात आहे. सध्या महापालिका क्षेत्रीय कार्यालयात १५-२० सेवक कार्यरत असून, जिथे डेंग्यू रुग्ण आहेत तिथे भेट देऊन डासांची उत्पत्ती असणाऱ्या ठिकाणांवर स्प्रे आणि फॉगिंग सुरू करण्यात आले आहे. त्याशिवाय शहरातील सोसायटींमध्ये जनजागृतीदेखील करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, वाढत्या डेंग्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेकडून शहरातील विविध सोसायट्या आणि झोपपट्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी डासांचे ब्रिडींग होत आहे तिथे जाऊन महापालिकेकडून कारवाई केली जात असून, यावर्षी ३१००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पाणी उकळून पिण्याचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी गढूळ येत आहे. त्यामुळे महापालिकेकडून पुणेकरांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहान करण्यात आले आहे. धरणातून येणाऱ्या पाण्यामध्ये गधूळपणा वाढला असल्याकारणाने महापालिकेकडून पाणी अकळून आणि गाळून पिण्याचे आवाहान करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे धरणातील पाणी जलशुद्ध केंद्रातून शुद्ध करण्यात येत असलं तरी पाणी पिण्याआधी उकळून प्यावे असे आव्हान पाणी विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Pmc In Action Mode After Dengue Cases Hike In City Area

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..