
पुणे : पुणे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची परिस्थिती हाताळण्यासाठी पुणे महानगरपालिकेने खासगी हॉस्पिटल्सना 'डिस्चार्ज पॉलिसी'चे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या डिस्चार्ज पॉलिसीनुसार, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेल्या रुग्णाला दहाव्या दिवशी कसल्याही टेस्टशिवाय डिस्चार्ज देण्याच्या सुचना आहेत. ज्या रुग्णांमध्ये सलग तीन दिवस कोरोनाची कसल्याही प्रकारची लक्षणे नाहीयेत, अशा रुग्णांसाठी ही डिस्चार्ज पॉलिसी आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. नव्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध करुन देणं दिवसेंदिवस आव्हान बनत असल्याचं चित्र आहे.
आज मंगळवारची परिस्थिती पाहता शहरात फक्त दोन ICU व्हेंटीलेटर्सचे बेड्स, 8 व्हेंटीलेटर नसलेले ICU बेड्स आणि 163 ऑक्सिजनसहित आयसोलेशन बेड्स उपलब्ध आहेत. वाढलेला संसर्ग आणि येत्या काही दिवसांत अधिक संसर्ग वाढण्याची परिस्थिती लक्षात घेता PMC ने आतापासूनच खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुणे महानगरपालिकेने 1 एप्रिलपासून सगळ्या मोठ्या खासगी हॉस्पिटल्सना त्यांच्या एकूण ऑपरेशन बेड्सपैकी 80 टक्के बेड्स कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच CoEP मधील जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी अधिक बेड्स उपलब्ध करवून देण्यासाठी देखील स्थानिक प्रशासन कामाला लागले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी बेड्सच्या उपलब्धतेची माहिती देणारी PMC वॉर रुम फोन कॉल्सच्या माध्यमातून सेवा देत आहे.
आम्ही आधी रुग्णाशी अथवा त्याच्या नातेवाईकांशी बोलून रुग्णाच्या आरोग्याच्या परिस्थितीचा अंदाज घेतो. त्यांना खरंच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची गरज आहे का हे बघतो. जर परिस्थिती गंभीर असेल तर त्यांना बेड उपलब्ध करुन दिला जातो मात्र, जर सौम्य अथवा लक्षणे नसतीलच तर त्यांना घरातच आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो. शहराच्या विविध भागात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा सल्ला देखील रुग्णांना दिला जातो. ऍडमिट केल्याच्या 7 व्या ते 9 व्या दिवसापर्यंत जर रुग्णांना सलग तीन दिवस ताप आणि इतर लक्षणे नसतील तर त्यांना 10 व्या दिवशी स्क्रीनिंग करुन डिस्चार्ज दिला जातो. डिस्चार्ज देताना कोरोनाच्या चाचणीची आवश्यकता नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.