

PMC Ajit Pawar And Eknath Shinde
ESakal
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी संभाव्य युतीबाबत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील चर्चा थांबलेली दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या पक्षाच्या प्रस्तावाला सहमत नाही. यामुळे आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नव्या युतीची नांदी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी राजकीय हालचालींना सुरूवात झाली आहे.