Ashadhi Wari 2025 : दोन दिवसांत तीस हजार वारकऱ्यांना मोफत उपचार
Pune News : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने यंदाच्या आषाढी वारीत दोन दिवसांत सुमारे ३० हजार वारकऱ्यांवर उपचार केले. २२ वैद्यकीय पथके, १५ रुग्णवाहिका आणि दोन फिरते दवाखाने यामध्ये कार्यरत होते.
पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून यंदा आषाढी वारीत सहभागी झालेल्या सुमारे ३० हजार वारकऱ्यांना दोन दिवसांत उपचार देण्यात आले. त्याचबरोबर डायल १०८ रुग्णवाहिकेतूनही सेवा पुरविण्यात आली.