
पुणे : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची माहिती महापालिकेस त्वरित मिळावी आणि संबंधित खड्डे दुरुस्ती तत्काळ व्हावी, यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या ‘पीएमसी रोड मित्र’ हे मोबाईल ॲप सुरू केले. संबंधित ॲप पुणेकरांसाठी खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ४२ नागरिकांनी महापालिकेकडे खड्ड्यांबाबत माहिती दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यानुसार, महापालिकेने संबंधित खड्डे तत्काळ दुरुस्त करण्यास सुरू केल्याचा दावा केला आहे.