
पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसह शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या नवीन रस्त्यांवर महापालिका आता पथदिवे बसविणार आहे. तब्बल साडेतीन हजार पथदिवे बसविण्याचे काम येत्या सहा महिन्यांत केले जाणार आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांसह समाविष्ट गावांमधील रस्त्यांवरील अंधार दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.