

pune municipal corporation
पुणे - शेकडो कोटी रुपये खर्च करून मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प पूर्ण केला आहे. पण या नदीकाठी जाण्यासाठी नागरिकांना रस्ताच नसल्याने त्याचा वापरच करता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने संगमवाडी ते बंडगार्डन पुलादरम्यान प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी ३८ हजार ५४२ चौरस मीटर खासगी जागा भूसंपादन करण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव ठेवला आहे.