
पुणे : कोथरूडमध्ये नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत; पण वाहनांची संख्या वाढत असताना एकही वाहनतळ नसल्याने पार्किंगची समस्या निर्माण होत होती. मात्र आता यातून काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण बांधकाम व्यावसायिकाकडून पुणे महापालिकेच्या ताब्यात कोथरूड येथे ३६४ चारचाकी आणि ४०२ दुचाकी असे ७६६ वाहनांसाठी मोठे पार्किंग आले आहे. हे पुणे शहरातील सर्वांत मोठे पार्किंग ठरले आहे. त्यामुळे याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास नागरिकांना फायदा होऊ शकतो.